छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): तालुक्यातील लाडगाव हिरा प्रथम, सोयगाव तालुक्यातील जरंडी द्वितीय, छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील पाटोदा तृतीय छत्रपती संभाजीनगर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत विभाग व जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत
पुरस्कारांची राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानेआज यादी जाहीर केली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये जिल्ह्यातील ३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे: लाडगाव / हिरा (छत्रपती संभाजीनगर) प्रथम, जरंडी (सोयगाव) ३० लाख, ५० लाख द्वितीय, पाटोदा तृतीय (छत्रपती संभाजीनगर) २० लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करून ग्रामविकास व पंचायतराज मंत्री आणि पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील ग्रामपंचायतींनी केलेल्या विकासकामांची दखल शासनाने घेतल्याने जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे अभिनंदन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम, अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड, आरोग्य व शिक्षण सभापती अनिता मोठे, महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षी पवार, समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामविकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष साहेबराव चव्हाण यांनी केले आहे.